Share

‘अस्वस्थता नाही, पण आम्हाला फसवलं गेलं याचं दुःख आहे’, खडसेंच्या विधानावर चंद्रकांत पाटलांचे उत्तर

Published On: 

पुणे : राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजप नेते अस्वस्थ आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची तळमळ सुरूच आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला होता. ते म्हणाले, भाजप आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी ‘सरकार पडणार’ अशी वक्तव्यं केली जात असतील असे खडसे म्हटले होते.

यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ खडसे आजही आमचे नेते आहेत. तिकडे गेल्यानंतर तरी त्यांनी खरं बोलावं असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच, गेल्या दीड वर्षात आम्ही अनेक आंदोलने केली. पंढरपूरही जिंकले. आम्ही काही अस्वस्थत नाही. आम्हाला फसवले गेले याचे दुःख आहे,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?
अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय चूकच होता. पण त्याचा पश्चात्ताप नाही. कारण ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो, तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. कारण राजकारणात तुम्ही मेलात, तर त्याला उत्तर देता येत नाही. खंजीर खुपसला गेल्याला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना, राग होता. त्यातून आम्ही ते केले असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!