मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी “आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे, याची जबादारी सरकारची असते”, असा गंभीर आरोप केला आहे. हा आरोप फेटाळत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी असे कोणतेही सुरक्षा काढून घेण्याचे आदेश न दिल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र या पाश्वर्भूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी बंडखोर आमदारांना टोला लगावला आहे.
राज्यातील राजकीय घडामोडीमुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातील आमदारांनी धक्का दिला आहे. दरम्यान “महाराष्ट्राला,जनतेला असुरक्षित करणाऱ्या आमदारांना कशाला हवी सुरक्षा”, असे ट्विट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्राला,जनतेला असुरक्षित करणाऱ्या आमदारांना कशाला हवी सुरक्षा????????????????????#महाराष्ट्र #महाविकास_आघाडी #बंडखोर_आमदार
— Rupali patil thombare (@Rupalispeak) June 25, 2022
संजय राऊत काय म्हणाले?
बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आल्यावरून एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही. महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?,भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात?”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

