Share

Atul Bhatkhalkar : “सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक…” ; अतुल भातखळकरांची संजय राऊतांवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. याची जबादारी सरकारची असते. असा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटले की, “ते महाराष्ट्राच्या बाहेर आहे. त्यांनी ढुंगणाला पाय लावून राज्यातून पलायन केले आहे. त्यांना आमदार म्हणून सुरक्षा आहे. आमदारांना सुरक्षा असते कुटुंबियांना नाही.  महाराष्ट्रात या, आपल्या राज्यात या. असे वणवण का फिरताय?,भिकाऱ्यासारखे फिरू नका. तुम्ही वाघ आहात बकरीसारखे का म्या म्या करत आहात?”, आता संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युतर दिले आहे.

“सूडाच्या राजकारणाचा हा शेवटचा अंक ठरणार आहे. चालू द्या… तुमचाही हिशोब होईलच “, असे ट्विटर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

असेही संजय राऊत म्हणाले –

आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. “शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही. शिवसेना पक्ष आमच्या रक्ताने बनलेला पक्ष आहे. शेकडो लोकांनी यासाठी बलिदान दिले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल. या संकटाला आम्ही एक संधी समजतो. शिवसेना हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आज लाखो शिवसैनिक आहेत. पक्ष मजबूत आहे. आजच्या कार्यकारिणी बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय होतील .आजची बैठक राजकारण आणि देशाला दिशा देणारी ठरेल.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!