पुणे : राज्य शासनाने सोमवारी आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ‘ब्रेक द चेन’ची नवीन नियमावली जाहीर केली. त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह १४ जिल्ह्यांमध्ये स्तर तीनचे नियम कायम ठेवले आहे. पण मुंबईतील दुकाने, कार्यालये आठवड्यातील सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंतची परावनगी दिली आहे. आता यावरूनच पुणे-मुंबईला वेगळा न्याय का असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ठाकरे सरकारला केला आहे.
शहराचा पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर झालेला अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आहे. महापौर म्हणून मी शहरातील व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून याबाबत राज्य सरकारने न्याय भूमिकेत राहावे. असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.
पुणे शहरातील कोरोना बाधितांचे प्रमाण साडे तीन टक्क्यांपेक्षा कमी होऊन देखील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा हा एकच घटक मानण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने शहरातील निर्बंध कमी झालेले नाहीत. दरम्यान कोविड निर्बंधांबाबत सोमवारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता महापालिकेनेही व्यापाऱ्यांना दिलासा देत दुकाने, आस्थापने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियाला धक्का! दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी सलामीवीर मंयक अग्रवाल बाहेर
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

