औरंगाबाद : २९ जुलै रोजी पंचायत समिती उपसभापती निवडणुकीत भाजपात दाखल झालेले अर्जुन शेळके विजयी झाले होते. काँग्रेसचा एका मताने या निवडणुकीत पराभव झाला होता. पराभव जिव्हारी लागल्याने आज सकाळी उपसभापती शेळके आपल्या दालनात कामकाज करत असताना त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत त्यांचे कपडे फाटले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीकडे धाव घेतली. शेळके पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. पराभव सहन न झाल्याने काँग्रेसच्या काही पंचायत समिती सदस्यांनी शेळकेंना मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
काँग्रेस आणि भाजपात राडा झाल्याने पंचायत समिती मध्ये धावपळ उडाली. पराभूत झालेले काँग्रेस सदस्य अनुराग शिंदे यांच्यासह ६ ते ७ जणांनी मारहाण केल्याचा आरोप उपसभापती शेळके यांनी केला आहे. दालनात खुर्च्यांची फेकाफेकी करण्यात आली. यामध्ये खिडकीच्या काचा फुटल्या आहेत. अशी माहिती सूत्राकडून मिळाली आहे. ऐनवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शेळकेंनी भाजपात प्रवेश करुन विजय मिळवला. काँग्रेसची मते फुटल्याने शिंदे यांचा पराभव झाला होता. शेळके यांना १० तर शिंदे यांना ९ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर राजकारण तापले.
महत्त्वाच्या बातम्या
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच मिळायला हवे’, यासाठी युवक काँग्रेस करणार जोरदार प्रयत्न!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
