मुंबई : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला दुखापतीने ग्रासले आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सुट्टीवर गेलेल्या भारतीय संघातील सलामीवीर शुभमन गील दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला होता. यानंतर झालेल्या सराव सामन्यात आवेश खान आणि वॉशिग्टंन सुंदर यांना दुखापत झाल्याने हे दोन्ही खेळाडू मायदेशी परतले आहे.
आता काही दिवसावर भारत आणि इंग्लंड कसोटी सामना येऊन ठेपला असताना आणखी एक खेळाडू जखमी झाल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान गोलंदाज मोहम्मद सिराजचा चेंडु लागल्याने सलामीवीर मंयक अग्रवाल हा जखमी झाला आहे. यावेळी त्याच्या डोक्याला बॉल लागला आहे. यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
मंयक अग्रवाल रोहित शर्मासोबत सलामीला खेळेल अशी अपेक्षा होती मात्र तो आता दुखापतीमुळे संघा बाहेर झाला आहे. यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि के एल राहुल हे दोघे भारताकडून सलामीला खेळतील हे जवळपास निश्चीत झाले आहे. डरहम येथे नुकत्याच पार पडलेल्या सराव सामन्यात के एल राहुलने शतक झळकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शहरातील विविध विकासकामाला गती देण्यासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी घेतली बैठक
- बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्याला कार्यकर्त्यांकडून चोप
- सावधानतेचा इशारा ; पुढचे २ महिने राज्यात जोरदार पाऊस कोसळणार
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
