मुंबई : हवामान विभागाकडून ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात 95 ते 105 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो आहे.
मात्र, पुढील दोन महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांच्याकडून पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.ऑगस्टमध्ये संपूर्ण देशात 94 ते 106 टक्के इतक्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात काही ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. पण पुढील दोन महिन्यांचा एकत्रित विचार केला असता, राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
IMD, ने जारी केलेल्या इशाऱ्या प्रमाणे राज्यात मंगळवारी व बुधवारी कोकणांत काही भागात दर्शवला प्रमाणे पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे
राज्यात इतरत्र हलका ते माध्यम पावसाची शक्यता.
त्याच्या पुढच्या २ दिवसात पावसाचे इशारे नाही pic.twitter.com/cLTTo2TV2M— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 2, 2021
दरम्यान आज आज राज्यात एकूण चार जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही तासांत पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत. याठिकाणी ताशी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारा वाहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा’ ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘सरकारकडून ‘ती’ यादी राज्यपालांना पाठवली पण अद्याप मंजुरी नाही’ ; राष्ट्रवादीचा घणाघात
- पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी केंद्र सरकारला केल्या ‘या’ तीन मागण्या
- ‘क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच मिळायला हवे’, यासाठी युवक काँग्रेस करणार जोरदार प्रयत्न!


