Share

‘मनमोहन सिंगांनी ‘तो’ सल्ला महाविकास आघाडी सरकारला का दिला नाही?’

Published On: 

मुंबई : देशातील कोरोनाच्या स्थितीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही सूचना केल्या होत्या. पण सध्या महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर झाली आहे. येथे काँग्रेस सत्तेत आहे. मग मनमोहन सिंग यांनी अशा सूचना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला का दिल्या नाहीत, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला देशात नकारात्मकतेचं वातावरण तयार करायचं आहे. मला प्रियंका गांधींना विचारायला आवडेल की त्यांनी कधी या गोष्टींबाबत महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारसोबत चर्चा केली. सध्या तिथे काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला? महाराष्ट्रात कोविडमुळे ३८ ते ४० टक्के मृत्यू झाले आहेत, याची कधी त्यांनी चौकशी केली? असे अनेक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलेत.

देशातील एकूण रुग्णांपैकी महाराष्ट्रातील ३५ ते ४० टक्के रुग्ण आहे. यापैकी ३५ ते ३७ टक्के रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. पहिल्या लाटेत राज्याला बिकट परिस्थितीतून जावे लागले. पूर्वानुभव असताना राज्य सरकार दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तयार का राहिलं नाही? उलट काहीतरी भयानक सुरू असल्याची गोष्ट सांगण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. मग त्यांनी महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारला तसा सल्ला का नाही दिला? असा आरोपही फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!