Share

कोरोनाचा परिणाम! अनेकांनी ‘ऑक्सिजन’ नावाच्या कंपनीत गुंतवले पैसे, नंतर कळाले ही तर..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोनाच्या संकटात सर्वात जास्त चांदी कोणाची होत असेल तर ती म्हणजे फार्मा कंपन्यांची. कधी नव्हे ते औषधी कंपन्यांना सुगीचे दिवसं आलेत. उत्पादने तर विकतच आहेत. शिवाय त्यांच्या कंपन्यांवर शेअर बाजारात चांगला दबदबा निर्माण केलाय. याचा फायदा गुंतवणूकदारही घेत आहेत. अनेकांनी शेअर बाजारात ऑक्सिजन नाव असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर कंपनीचा ऑक्सिजनशी काही संबंध आहे की नाही, हेही न पाहता गुंतवणूकदार पैसे गुंतवत आहेत.

मात्र, खातरजमा न करता केवळ नावावरून पैसे गुंतवणे किती महागात पडू शकते याचे उदाहरण समोर आले आहे. बाजारपेठेत ऑक्सिजनची मागणी पाहता बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या कंपनीत अनेकांनी पैसे गुंतवले. सोमवारी बाजार उघडताच या कंपनीचा शेअर बीएसईच्या अपर सर्किटची मर्यादा २४,५७४.८५ रुपयांवर पोहोचला. पण दुसऱ्याच दिवशी गुंतवणूकदारांना कंपनीचे ऑक्सिजन निर्मितीच्या व्यवसायाशी काहीही देणेघेणे नसल्याचे समजले.

यानंतर कंपनीच्या शेअर्सनी बुडी मरली. शेवटी लोअर सर्किट लागून शेअर २३,३४६.१५ रुपयांवर आला. हा शेअर बीएसईच्या देखरेखीत असल्याने त्यात कमाल नफा वा नुकसानीची मर्यादा ५ टक्के आहे. महिनाभराच्या आतच ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवत शेअर १३३ टक्के वधारला. बॉम्बे ऑक्सिजनच्या शेअरमध्ये गेल्या काही दिवसांत उसळी आली आहे. त्याचे मूल्य मार्चअखेरीच्या १० हजार रुपयांवरून दुप्पट झाले आहे.

फक्त याच कंपनीच्या बाबतीत लोकांचा अंदाज चुकला असे नाहीये. नावात मागेपुढे ऑक्सिजन शब्द असलेल्या अनेक कंपन्या आहेत. त्या औद्योगिक वायुंचे उत्पादन करतात. सध्या नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड, भगवती ऑक्सिजन लिमिटेड आणि गगन गॅसेससह अनेक कंपन्यांच्या नफ्यात उसळी आली आहे. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर नावावर न जाता जास्तीची माहिती घेऊन पैसे गुंतवा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!