🕒 1 min read
अकोला : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्र व राज्य सरकारला मानवी जीवापेक्षा उद्योग महत्त्वाचे वाटतात, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्यावरून एका फार्मा कंपनीच्या बचावासाठी भाजप नेत्यांची पुढाकार घेतला. त्यामुळे भाजपला कोरोनाविरुद्धच्या लढ्यापेक्षा राजकारणातच महत्त्व आहे, असेही आंबेडकर म्हणाले.
पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सध्या कोरोना कसा भीतीदायक आहे, हे बिंबवण्यात येत आहे. त्यापेक्षा त्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर औद्योगिकसाठीचा वापर बंद झाला. सरकारला मानवी जीव किड्यामुंग्यांसारखी वाटत असून, माणुसकी शिल्लक राहिली आहे काय, असा प्रश्न सध्या पडत आहे.
केंद्र सरकारकडून लसीचे मार्केटिंग होत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. लस टोचून घेतल्यानंतरही आवश्यक ती काळजी घ्यावीच लागणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून व्यवस्थापन अजिबात होत नाहीये. निर्बंध, मार्गदर्शक सूचनांमध्ये विसंगती असल्याचा आरोप केला. ७० वर्षांच्या काळात १० लाख रुग्णांवर एकाच वेळी उपचार होतील, एवढ्याही खाटा उपलब्ध न होणे ही शोकांतिका असल्याचे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
