कोलकाता : कोरोनाच्या संकट काळात विकास दर टिकवून ठेवण्यासाठी उद्योग आणि सरकार यांच्यात पूर्ण विश्वास असणे आवश्यक असल्याचे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
सीतारमण म्हणाल्या, कोरोनाची दुसरी लाट असूनही अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन सुरू व्हावे, यासाठी केंद्राने अनेक पावले उचलली आहेत. विकास दर कायम ठेवण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यात परस्पर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. अविश्वास निर्माण करणारे, असे काहीही होऊ नये.
पश्चिम बंगालबद्दल त्यांनी सांगितले की, राज्यातील उद्योगांच्या विकासासाठी जागतिक दृष्टिकोनासह ऑक्सिजनची आवश्यकता आहे. राज्यातील उद्योगांना भरभराट होण्यासाठी भरपूर प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता आहे. भारताचा इतिहास बंगालमधून लिहिला गेला होता. पण आज दार्जिलिंग चहासारखे प्रस्थापित उत्पादनदेखील एका कठीण अवस्थेतून जात आहे. कोलकाता पूर्वी उद्योगांसाठी ओळखला जात असे. त्याने पुन्हा ते केले पाहिजे. बंगाल आणि त्याची परंपरा जपली पाहिजे.
महत्वाच्या बातम्या
- घटना दुर्देवी! यापुढे असे घडणार नाही याची काळजी घ्यावी-रामदास आठवले
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

