Share

‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’

Published On: 

बुलडाणा : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात आ. राजेश एकडे, आ. संजय गायकवाड, आ. डॉ. संजय रायमूलकर यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

गेल्या वर्षभराच्या कालावधीत महामारीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा व महाराष्ट्रामध्ये असंख्य निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहे. त्यामुळे राज्य सरकार आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी ऑक्सिजन, लसीकरण रेमडेसिविर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, बेड, उपलब्धतेसाठी केंद्र सरकारकडे वारंवार मागणी करत आहे.

परंतू विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पूर्तता होवू नये यासाठी त्यास विरोध करत आहेत. तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन राज्य सरकारची बदनामी व मानहानी करीत आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा महाराष्ट्रास मिळू नये यासाठी फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने देखील त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरूद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!