Share

हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर, आ.चंद्रकांत पाटलांच्या प्रयत्नांना यश

Published On: 

भुसावळ : लोकसहभागातून कोरोनाविरूद्ध लढाईला बळ देणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यात लवकरच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयातून मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहे.

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात नियोजित नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कोरोनाविरूद्धच्या लढाईत परिणामकारक अस्त्र ठरेल. या प्रकल्पातून २५० ते ३०० सिलिंडर नैसर्गिक ऑक्सिजन तयार होईल. त्यातून मुक्ताईनगर, बोदवड, सावदा, रावेर येथेही ऑक्सिजन पुरवठा शक्य होईल.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून अतिदक्षता विभाग व हॉस्पिटलचे नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. नेमके या काळात रुग्णसंख्या वाढल्याने आमदारांनी लोकवर्गणीची संकल्पना राबवत येथे ड्युरा ऑक्सिजन सिलिंडर आणून दिले. ही यंत्रसामग्री मिळून उपजिल्हा रुग्णालयात १० व्हेंटिलेटरवर, १० बाय पॅप मशीन व ५२ ऑक्सिजनवर ७२ रुग्ण उपचार घेत आहेत.

पण ऑक्सिजन तुटवड्यामुळे येथील रुग्णसेवा अडचणीत आली. प्रसंगी येथील रुग्णांना इतरत्र हलवताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. ऑक्सिजन टंचाईमुळे निर्माण होणारी स्थिती पाहता येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंजुरीचे पत्र प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!