Share

जाणून घ्या सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणीस नकार का दिला ?

Published On: 

नवी दिल्ली- मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (बुधवार, 24 मार्च) सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली. पण याबाबत कोणताही निर्णय न देता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावे, असे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी याचिकेत केलेला आहे. सिंग यांनी याचिकेत तीन मागण्या केल्या होत्या. अनिल देशमुख यांच्या गैरव्यवहारांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून करण्यात आलेली बदली बेकायदेशीर असून, ती रद्द करण्यात यावी आणि पुढील कारवायांपासून संरक्षण मिळावं, अशा मागण्या सिंग यांनी याचिकेत केल्या होत्या.

दरम्यान,सिंग यांच्यावतीने  मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. ही याचिका थेट सुप्रीम कोर्टात आणण्याचे कारण काय? ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात का दाखल केली नाही? तसेच या याचिकेत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यांना पक्षकार का केले नाही, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केली आहे.

आपण अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका का दाखल केली, 226 वर का गेला नाहीत? असे थेट सवाल उपस्थितीत केले.दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत असा सवाल करत हि याचिका कोर्टाने फेटाळून लावली. दरम्यान यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु अशी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!