मुंबई – अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
दरम्यान,वाझे प्रकरणात भाजप आक्रमक झाली आहे. सचिन वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले.हा पैसा कुठून आला, कुठे गेला त्याचा तपास एनआयए, ईडी, रिझर्व्ह बँक, रजिस्ट्रार ऑफ कंपनी, इन्कम टॅक्स अशा विभिन्न खात्यांनी केला पाहिजे असे पत्र आग्रह मी केला आहे असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
पैसा कुठून आला, कुठे गेला कॅश ट्रेल, बीटकॉईनचा उपयोग झालेला आहेत, बेनामी ट्रान्झाकशन आहेत ऑफशोर कंपन्या आहेत या सगळ्याचा तपास व्हायला हवा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सचिन वाझे यांनी 100 दिवसांकरता 5 स्टार हॉटेलमध्ये रुम्स बूक केले होते. या रुमचे पैसे एक ज्वेलर्स व्यापारी देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारमधील हा मोठा ज्वेलर्स व्यापारी आहे. 100 दिवसांचं भाडं म्हणून या ज्वेलर्सने 25 लाख रुपये हॉटेलमध्ये भरले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- … म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला २६ मार्चच्या भारत बंदला पाठींबा
- ‘अस्तनीतील हे निखारे राज्य सरकारने पदरी बाळगले होते’
- प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल-भुवी बद्दल वीरूचे भन्नाट ट्विट व्हायरल
- ‘विरोधी पक्षाने सरकार खिळखिळे करण्यासाठी या अधिकाऱ्यांशी संगनमत केले’
- धवन-रोहित जोडीने मोडला सचिन-सेहवागचा रेकॉर्ड


