पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने शिखर धवनसोबत शतकी भागीदारी करताना अर्धशतक झळकावले आहे. या अर्धशतकादरम्यान कोहलीने एका विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
दमदार पुनरागमन करत मिळवलेल्या विजयानंतरही कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका होताना दिसत आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं संघ निवडीच्या निर्णायवरून विराटवर गंभीर आरोप केले. संघ निवडताना भेदभाव होत असल्याचा आरोपही सेहवागनं केला. सातत्यानं अपयशी ठरूनही लोकेश राहुल याला संधी मिळते, तर दुसरीकडे युझवेंद्र चहलला १-२ सामन्यांतील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर बसवले जाते, यावरून वीरू चांगलाच भडकला.
क्रिकबजशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला,”गोलंदाजाला एका सामन्यातील खराब कामगिरीमुळे संघाबाहेर केले जाते, तेच फलंदाज लोकेश राहुलला चारवेळा संधी दिली जाते. गोलंदाजांनाही काही सामन्यातील खराब कामगिरीनंतरही संधी मिळायला हवी. युझवेंद्रच्या जागी जसप्रीत बुमराह असता आणि चार सामन्यांत त्याला चांगली कामगिरी करता आली नसती, तर त्याला संघाबाहेर केलं असतं का?, अजिबात नाही. तेव्हा तुम्ही म्हणाला असता की तो चांगला गोलंदाज आहे आणि तो पुनरागमन करेल.”
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- रश्मी शुक्लांना अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती, परमबीर सिंह यांचा याचिकेत मोठा दावा
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘फडणवीस… उगाच लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा विश्वास ठेवत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

