मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमकतेला मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी उत्तर दिले आहे.
माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असं देखील भाई जगताप म्हणाले आहेत.
यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करत भाई जगताप यांचा जोरदार समाचार घेतला आहे. ‘ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’… अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांना खडसावले होते.
भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2021
दरम्यान, आज भाजपचे नेते निलेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. राणे यांनी भाई जगतापांवर टि्वट करून निशाणा साधला आहे. राणे आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,”भाई जगताप तो टपोरी आहे, ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं” असा टोला राणे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- ‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘फडणवीस… उगाच लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा विश्वास ठेवत नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

