Share

विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो

Published On: 

पुणे : पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आहे. या मालिकेत होणारे तीनही सामने पुण्यातील एमसीए (गहुंजे) स्टेडियमवर खेळवले जात आहेत. या सामन्यामध्ये कृणाल पांड्यासह प्रसिद्ध कृष्णा याने देखील एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. त्याने सलामीवीर जेसन रॉय, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग्स यासारख्या खेळाडूंसह टॉम कुरणला बाद करून चार बळी आपल्या नावावर केल्या. पहिल्याच सामन्यात एवढ्या दिग्गज खेळाडूंचा बळी घेत त्याने भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. यामुळे त्याच क्रिकेट रसिकांकडून कौतुक केलं जात आहे.

अशातच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक प्रश्न विचारला गेला… प्रश्न होता टी-20 वर्ल्ड कपविषयीचा… पण उत्तराच्या केंद्रस्थानी होता कर्नाटकचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा…  हा तोच प्रसिद्ध कृष्णा ज्याने इंग्लंडच्या विरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या मॅचमध्ये चार विकेट्स घेऊन इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले.

विराट कोहलीच्या नजरेस प्रसिद्ध कृष्णा मागच्याच वर्षी पडला, ज्यावेळी तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. एका पत्रकार परिदषेत विराटला टी 20 वर्ल्ड कपविषयी विचारलं गेलं त्यावेळी विराटने प्रसिद्ध कृष्णाचं नाव सरप्राईज पॅकेज म्हणून घेतलं.

प्रसिद्ध कृष्णाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलीय. तो सरप्राईडज पॅकेज ठरू शकतो, असा अंदाज विराटने बांधला होता. काल इंग्लंड विरुद्ध प्रसिद्धने एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात पुनरागमन केलं. आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या चार धडाकेबाज फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!