Share

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट

Published On: 

पुणे : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणालने एकदिवसीय पदार्पणात वेगवान अर्धशतक झळकावण्याची कामगिरी केली. दरम्यान, या खेळीनंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासाठी खूप मोठा भावुक क्षण होता. कारण, काहीच महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. या दुःखातून सावरून हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. पदार्पणात सामन्यातच विश्वविक्रमी खेळी केल्यानंतर कृणालला रडू कोसळलं. बीसीसीआयने देखील हा भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यात, कृणाल आपल्या धाकट्या भावाच्या म्हणजेच हार्दिकच्या गळ्यात पडून रडताना दिसत आहे.

वाढदिवसाच्या आदल्या दिवशी कृणालला टीम इंडियात स्थान मिळालं हे त्याच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट ठरलं. हार्दिक पांड्याच्या  हातून कृणालला वन डे टीमची कॅप देण्यात आली आणि कृणालने इमोशनल होत भावाला घट्ट मिठी मारली. जानेवारीत निधन झालेल्या वडिलांची आठवण काढत ती कॅप आकाशाच्या दिशेनं उंचावली आणि पदार्पणात जलद अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. मैदानावर इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा कृणाल कॅमेरासमोर वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला. डगआऊटमध्ये बसलेला हार्दिकही भावाला पाहून इमोशनल झालेला पाहिला.

https://www.instagram.com/p/CMxPKzEj9Ma/?utm_source=ig_web_copy_link

नुकतंच कृणालनं एक भावुक पोस्ट लिहिली, ”प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात फक्त आणि फक्त तुमचाच विचार सुरू होता, पप्पा. तुम्ही माझ्यासोबतच आहात, असे वाटत होते आणि त्यामुळे डोळे भरून आले होते. तुम्ही माझी ताकद आहात आणि मला तुमचा कायम पाठींबा मिळत राहिला, त्यासाठी तुमचे आभार. ही खेळी तुमच्यासाठीच आहे आणि यापुढे आम्ही जे काही करू, तेही तुमच्यासाठीच असेल,”

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!