🕒 1 min read
मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन स्फोटकांच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर, स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले होते. दरम्यान, या प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. सबळ पुराव्यांनिशी त्यांना एनआयएने अटक केली होती.
परंतु आता या सर्व प्रकरणाला वेगळा ट्वीस्टमिळाला आहे. तपास करणाऱ्या NIA मध्ये एक मोठी पण वेगळी घटना घडली आहे. NIA चे महानिरिक्षक (IG)अनिल शुक्ला यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ती देखील थेट मिझोराम येथे त्यांची हि बदली करण्यात आलेली आहे.
अनिल शुक्ला यांच्या जागी आता IPS अधिकारी ज्ञानेंद्र वर्मा यांची एनआयएच्या महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे सचिन वाझे आणि त्याच्याशी संबंधित लोकांची चौकशी सुरु असताना अचानक एनआयएमध्ये करण्यात आलेल्या या फेरबदलामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
यामुळेच आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता या बदलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. NIA चे महानिरिक्षक (IG)अनिल शुक्ला यांची तडकाफडकी बदली का करण्यात आली ? याचे उत्तर समोर आले पाहिजे अशी मागणी आता मुश्रीफ यांनी केली आहे. यामुळे आता या प्रकरणाला भविष्यात कसे वळण मिळत आहे हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांचा रुग्णालयात गुढीपाडवा; अजितदादांनी घेतली भेट, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
- ‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- महाविकास आघाडीच्या ‘त्या’ निर्णयाचं चित्रा वाघ यांनी केलं स्वागत !
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
