मुंबई : राज्यासह देशात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्युने भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी गेले अनेक दिवसांपासून करत होते.
याच पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत कोणता निर्णय घ्यायचा याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक काल घेण्यात आली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दहावी व बारावीच्या परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्यात निर्माण झालेली कोरोनाची चिंताजनक परिस्थिती पाहता दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या बद्दल शिक्षणमंत्र्यांचे आभार, अशी प्रतिक्रिया माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसात राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे व भीतीचे वातावरण होते. वारंवार आम्हा लोकप्रतिनिधींंकडे याबाबत पालक चिंता व्यक्त करीत होते. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षा न घेता तारखा तुर्तास पुढे ढकलण्यात याव्यात. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यावर योग्य वेळी आँनलाईन व आँफलाईन अशा योग्य पद्धतीने परिक्षा घ्याव्यात, अशी मागणी आम्ही भाजपातर्फे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. त्यानुकसान आमची मागणी मान्य करुन तातडीने हा निर्णय घेऊन शिक्षणमंत्र्यांनी पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दलित भिकारी नाहीत तर शिकारी आहेत : रामदास आठवले
- कुंभमेळ्यातील गर्दीवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले..
- Breaking : रशियानंतर नंतर अमेरिका, ब्रिटन, जपानच्या लसींच्या वापरालाही भारतात परवानगी
- बोगस डॉक्टरने सुरु केले होते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पुण्यातील धक्कादायक प्रकार
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल


