Share

उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल

Published On: 

कल्याण – दोन दिवसांच्या वीकेंड लॉकडाउननंतर पुन्हा कडक लॉकडाउन लागण्याच्या भीतीने शहरातील दुकानांसह उपनगरांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडताना पाहायला मिळत आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने डीमार्ट बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचे दिसून येत आहे

गुढीपाडवा आणि लॉकडउनच्या शक्यतेने नागरिकांनी सकाळपासून किराणा दुकाने, भाजी व फळांचे विक्रेते, मिठाईची दुकाने, बँक, पेट्रोल पंप, दुग्धालय येथे गर्दी केली होती. कल्याण परिसरातील नागरिकांनी वीकेंड लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला होता; पण आज सकाळपासूनच नागरिकांनी भाजीपाल्यासह किराणा घेण्यासाठी दुकानांसमोर रांगा लावल्या मात्र डी मार्ट बंद असल्याने एक तरुणी भलतीच संतापल्याचे दिसून आले.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना या तरुणीने आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.‘किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? असं नाही की उद्धव काका घरी किराणा पाठवणार?’ असा थेट सवाल उपस्थित करत या तरुणीने आपला राग थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच काढला.

आपला संताप व्यक्त करताना ही तरुणी म्हणाली,’दोन-तीन दिवस झाले, आम्ही नंबर घेतोय, कॉल करतोय, नंबर मिळत नाहीये. इथे आलो, रांग लावली. कूपन मिळत नाहीये. मग किराणा घ्यायचा कधी आणि खायचं काय? ठीक आहे लॉकडाऊन आहे, आम्ही घरी बसतो, घरात बसून पाणी तर पिणार नाही ना? खायला लागेल’.

‘किराणा दुकान बंद, डी मार्ट बंद, मग जायचं कुठे? असं नाही की उद्धव काका घरी पाठवणार आहेत किराणा? नाहीतर घरपोच सेवा करा, आम्ही खाऊ घरी. गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांना किराणा नाहीये घरी. मग करायचं काय?’ असा सवाल तरुणीने विचारला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!