मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी चाचण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. यानंतर त्यांच्यावर ३१ मार्च रोजी एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्रास जाणवू लागल्याने एक दिवस आधीच ते रुग्णालयात दाखल झाले होते.
यानंतर त्यांच्यावर यशस्वी शत्रक्रिया करण्यात आली होती. एन्डोस्कोपीद्वारे त्यांच्या पित्ताशयातील खडे काढण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ.बलसरा यांनी काल एक यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान, यंदा कोरोनाच्या सावट असल्याने राज्यभरात गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. तर, शस्त्रक्रियेनंतर पवार अजूनही रुग्णालयातच असल्याने त्यांचा हा सण रुग्णालयातच पार पडला आहे. या सणानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री व शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी सपत्नीक रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर फोटोसह शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.
सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट –
https://www.facebook.com/supriyasule/posts/4133099110055388
आदरणीय शरद पवार साहेबांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरचा हा गुढीपाडवा. बाबा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना भेटण्यासाठी अजितदादा आणि सुनेत्रावहिनी आले. यानिमित्ताने आई, बाबा, दादा-वहिनी आणि आम्ही दोघे असे सर्वजण हॉस्पिटलमध्ये एकत्र आलो. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नेहमीच्या उत्साहाने गुढीपाडवा सण साजरा करता येत नाही. पण कुटुंबीयांच्या सोबत आनंदाचे क्षण वाटून घेऊन आपणास या परिस्थितीवर मात करण्याची ऊर्जा मिळेल. गुढीपाडव्याचा हा सण आनंदाने साजरा करा.काळजी घ्या, सुरक्षित रहा!
महत्त्वाच्या बातम्या
- मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवार साहेबांचा नाद करु नका – धनंजय मुंडे
- ‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’
- …म्हणून आशिष शेलार यांनी मानले वर्षा गायकवाड यांचे आभार
- महाविकास आघाडीच्या ‘त्या’ निर्णयाचं चित्रा वाघ यांनी केलं स्वागत !
- उद्धव काका घरी किराणा पाठवणार आहेत का? डीमार्ट बंद झाल्याने तरुणीचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

