Share

‘मुख्यमंत्र्यांची आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे, त्यानंतर ते लॉकडाऊनचा निर्णय घोषित करतील’

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, गेले काही दिवस राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत तयारी देखील सुरु आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन बाबतच्या निर्णयाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध नेत्यांसह अधिकाऱ्यांसोबत देखील बैठकीचा सपाटा लावला आहे. सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक, राज्याचे मुख्य सचिव सचिन कुंटे यांच्यासोबत बैठक पार पडल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंगळवारी जनतेशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, गेले काही दिवस मंत्र्यांसह माध्यमांसमोर येऊन लॉकडाऊनबाबत विविध विधाने करत आहेत. याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मला कुणी तरी एक मेसेज पाठवला. सगळ्यांशी चर्चा झालेली आहे. आता फक्त कोरोनाशी चर्चा बाकी आहे. त्यानंतर निर्णय घोषित केला जाईल, असं त्या मेसेजमध्ये म्हटलं होतं,’ असं भाष्य करत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!