Share

महाविकास आघाडीच्या ‘त्या’ निर्णयाचं चित्रा वाघ यांनी केलं स्वागत !

Published On: 

मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी सोबत अनेक उद्योगांचे माहेरघर देखील आहे. ह्या माहेरघराकडे सामान्य जनता उपजिविकेसाठी धाव घेत असते सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात त्यांना येथे राहायला अनंत अडचणी येतात परंतु म्हाडा आता ह्या संघर्षाच्या काळात आपल्या कष्टकरी माता भगिनींना साथ देणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

गृहनिर्माण विभागातर्फे ५००घरे वसतिगृहाच्या स्वरूपात असून काही वर्षांतच हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. काबाड कष्ट करून आपल्या संसाराचे पोट भरणाऱ्या,कठीण मेहनत करून ज्ञानार्जन करणाऱ्या महिलांच्या सेवेसाठी रुजू करणार आहोत, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केल्यामुळे गरजू महिलांना याचा मोठा आधार मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकारविरोधात गेले अनेक महिने विविध प्रकरणांवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मुंबईत आवश्यकता होतीचं….स्तुत्य उपक्रम’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

…म्हणून सुप्रिया सुळेंनी मानले जितेंद्र आव्हाड यांचे आभार !

राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी अशा वसतिगृहाची मागणी केली होती. यामुळे ही मागणी अवघ्या तीन दिवसांत मान्य केल्याने त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत. ‘‘राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपले करिअर घडविण्यासाठी अनेक महिला व मुली मुंबईत येतात.परंतु राहण्याची योग्य व्यवस्था नसल्याने त्यांची आबाळ होते. हे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ताडदेव येथे म्हाडाच्या वतीने ५०० खोल्यांचे वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही मागणी केली होती. या मागणीला त्यांनी तातडीने प्रतिसाद दिला.’ असं सुळे म्हणाल्या.

‘एवढंच नाही तर केवळ तीन दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करुन वसतिगृह बांधण्याचा निर्णय जाहिर केला. या निर्णयामुळे अनेक महिलांना राहण्याची काळजी न करता आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करता येणे शक्य होणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. आव्हाड व मंत्रीमंडळातील सर्वांचे मनापासून आभार,’ असं ट्विट देखील सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!