Share

मलिकांनी घरावर पाळत ठेवल्याची तक्रार ट्वीट करून का दिली; की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही?

Published On: 

मुंबई : ‘मागील काही दिवसांपासून गाडीत बसलेले हे लोक माझे घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत’, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी ट्वीट करत केला आहे. फक्त एवढेच नाही तर या संशयितांचे फोटो देखील मलिकांनी ट्विट केले आहेत.

ट्विटमध्ये मलिक म्हणाले आहेत की,’या गाडीत बसलेले हे लोक मागील काही दिवसांपासून माझं घर आणि शाळेची ‘रेकी’ करत आहेत. जर कुणी यांना ओळखत असेल तर मला माहिती द्या. या फोटोत असलेल्या लोकांनी मला येऊन भेटावं, मी सर्व माहिती देतो असंच माझं त्यांना सांगणं आहे.’ मात्र आता या ट्वीटवरूनच भाजपचे नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar)यांनी मलिक यांना सवाल करत टोला लगावला आहे.

नवाब मलिक स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्विट करून का करतात? की गृहमंत्र्यांवरही विश्वास नाही का? असा खोचक सवाल करणारे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी नवाब मलिकांना टोला लगावला आहे.
दरम्यान, मलिक यांनी एकूण ५ फोटो ट्वीट केले असून यात एका कारमध्ये दोन व्यक्ती बसलेले दिसत आहेत. त्यातील एक गाडी चालवत आहे, तर दुसरा मागच्या बाजूला बसला आहे. मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला दिसत असून त्याच्या हातात कॅमेरा देखील दिसत आहे. तसेच या फोटोमध्ये गाडीचा क्रमांकही दिसतो आहे. परंतु, हे फोटो नेमके कुणाचे आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!