Share

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला – शिरोडकर

Published On: 

मुंबई : मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे आता शिवसेनेने मनसेला मुंबईत जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र होते. तसेच त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. मित्राचा मुलगा या नात्याने आदित्य देखील राज यांच्या निकट होते. मात्र मनसे विद्यार्थी सेनेच्या कामावरून मनसेत त्यांच्याबद्दल नाराजी होती. परिणामी आदित्य हे देखील फारसे सक्रिय नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा होती यातूनच त्यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, आता, आपल्या शिवसेना प्रवेशाचे राजकारण त्यांनीच सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपद्धती पाहून, त्यांच्या कामापासून प्रेरीत होवून मी शिवसेनेत प्रवेश केला, असे आदित्य शिरोडकर यांनी म्हटलंय.

मनसेच्या स्थापनेपासून 2012 ची विधानसभा असेल किंवा त्याही पुढील निवडणुका असतील. एकाच पक्षात काही नेत्यांमध्ये मतभेद होतात, पण कालांतराने ते वाढतच गेले, अखेर संयम संपल्यानंतर मी काल शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य शिरोडकर यांनी स्पष्टीकरण दिलं. राजकारणात काही तत्त्व असतात, ते पाळले पाहिजेत. वैयक्तिक राजकीय विषय आहेत, ते प्रसारमाध्यमांसमोर बोलणं चुकीचं होईल, म्हणून मी जास्त खोलात जात नाही, असेही शिरोडकर यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!