Share

पवार आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच!; ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पण त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र, या भेटीवरून राज्यात विविध तर्कांना उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी या भेटीमागचे गुपित सांगितले आहे. नागरी आणि सहकारी बँकांवर रिझर्व बँकेने आणलेल्या निर्बंधांच्या बाबत ही भेट झाल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिले. पण तरीही राजकीय विश्लेषकांना ही भेट वेगळ्या कारणामुळेच झाली असावी असे वाटते.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या भेटीवर भाष्य केले आहे. एका वृत्तवाहिणीशी संवाद साधताना दरेकर म्हणाले की, ‘शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणे स्वाभाविक आहे. पण महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असे त्यांना वाटले असेल.’

‘राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणे हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच’, असा दावा त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!