🕒 1 min read
मुंबई : रिझर्व्ह बॅंकेने चार टक्के महागाईचे उद्दिष्ट ठरविले होते. प्रत्यक्षात महागाईने सहा टक्क्यांचा आकडा ओलांडला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची ताजी आकडेवारी महागाई ६.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दाखवत आहे. खाद्यान्नाची महागाई ५.५८ टक्के झाली आहे असे काँग्रेसने सांगत केंद्र सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे हे देखील मोदी सरकारवर टीका करत आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे ट्विटरच्या माध्यमातून नेहमी काहीतरी वेगळे लिहित असतात. त्यामुळे त्यांचे ट्विट चर्चेत असते. मात्र, आज त्यांनी ‘कुछ है नही लिखने को’ असे ट्विट केले. याचाच हवाला घेत सत्यजित तांबे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बच्चन यांचे ट्विट शेअर करत ‘तुम्ही केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल तर बोलत नाहीत ना?’ असा खोचक सवाल करत टोला लगावला आहे.
Is he talking about central government's achievements? https://t.co/f4QF6V47PB
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 17, 2021
मोदी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी देशातील जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवलं होत. मात्र आता देशातील जनतेवर वाईट दिवस आल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी अनेकांचे प्राण गेले. त्यातच आता कोरोना लसीवरून राजकारण सुरू आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले. दुसरीकडे राजधानी दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे विरोधक मोदी सरकारवर टीका करताना एकही संधी सोडत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या
- पवार आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच!; ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया
- ‘..तर मग ‘त्या’ बार मालकांची साधी चौकशीही का केली नाही?’, काँग्रेसचा ईडीला सवाल
- ‘आता काय सुप्रीम कोर्टही देशद्रोहींसोबत आहे का?’ काँग्रेस नेत्याचा मोदींना खोचक सवाल
- ‘राज्यपालांनी हेवेदावे विसरून १२ आमदारांची नेमणूक करावी’, राज्य सरकारचे आवाहन
- मोठी बातमी! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
