Share

‘..तर मग ‘त्या’ बार मालकांची साधी चौकशीही का केली नाही?’, काँग्रेसचा ईडीला सवाल

Published On: 

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यांच्यावर मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपये खंडणी घेतल्याचा आरोप आहे. यावर कारवाई करत ईडीने देशमुख यांच्या दोन्ही घरांवर छाप मारले. तसेच आता त्यांची ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

यावरच काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ईडीला काही प्रश्न विचारले आहे. ते ट्विटमध्ये म्हणातात, ‘ईडीने उत्तर द्यावे की ३०० कोटीची माध्यमांमध्ये चर्चा आहे, त्याची पुष्टी करता का? ईडीच्या म्हणण्याप्रमाणे ही जमीन २००५ मध्ये विकत घेतली होती आणि २ कोटी ६७ लाख एवढ्या किंमतीची आहे. २००४ मध्ये घेतलेल्या घराचे या प्रकरणाशी काय संबंध?

‘तुम्ही जाहीर केले की डान्स बारच्या मालकांनी वाझे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख दिले. त्या बार मालकांना अद्याप अटक का केली नाही? तथाकथित १०० कोटींच्या मागणीची माहिती असूनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या परमबीर सिंग यांची चौकशी का केली जात नाही?’ अशा प्रकारचे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केलेत. ‘हे सर्व महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी मोदी सरकारचा कट आहे. मात्र, यातून महाविकास आघाडीला बळ मिळत आहे’ असेही सावंत म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!