🕒 1 min read
नवी दिल्ली : राजकारणातील दोन बड्या नेत्यांची दिल्लीतील भेट आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा झाली. या भेटींनंतर अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत.
दरम्यान, राज्यात विविध चर्चांना उधाण आले असताना खुद्द शरद पवार यांनी या भेटीचा खुलासा केला आहे. ‘नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आली आहे. याविषयीचं निवेदन पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. पवार यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांवर चर्चा झाली.
Through a letter, I have drawn the kind attention of our Hon’ble PM towards issues and conflicts in the wake of certain developments in the co-operative banking sector. Although the objects and reasons for amending the Act can be lauded, pic.twitter.com/DCVpJs1zAi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
‘त्यांना सहकारी बँकिंग क्षेत्रातील काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक पत्र दिले आहे. त्यामध्ये सहकारी बँकिग क्षेत्रातील मुद्दे आणि समस्या मांडल्या आहेत. देशभरातील सहकारी बँकांची अनेक गाऱ्हाणी आली आहेत. त्याचा विचार करता यात केंद्र सरकारने लक्ष घालावे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात’ अशी विनंती पवार यांनी केली आहे.
I reiterated in the letter that the aims and objectives of the Amended Act are well-intentioned, and many provisions are necessary. Erring Board and Management must definitely be acted upon strictly and the depositors’ interests should be protected,
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 17, 2021
केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे सहकारी बँकांना मोठं नुकसान होत आहे. रिझर्व्ह बँकेला खूप अधिकार देण्यात आले आहेत. सहकारी बँकेतून एखादा व्यक्ती कर्ज घेतो, त्यावेळी महाराष्ट्रातील कायद्यानुसार अडीच टक्के शेअर कॅपिटल त्यांना घ्यावा लागतो. पण कर्ज परत केल्यानंतर आपली शेअर कॅपिटलची रक्कम परत मिळावी अशी त्याची अपेक्षा असते. पण नव्या नियमांनुसार ती परत मिळू शकत नाही. यामुळे एखादा उद्योजक सर्व शेअर खरेदी करून बँकेवर कब्जा करू शकतो. नव्या नियमांमुळे सहकारी बँकांच्या स्वायत्ततेवर गदा आल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांनी खुलासा केल्याने ही भेट राजकीय नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. मात्र, एक तास झालेल्या या बैठकीत केवळ सहकारी बँकाबद्दल चर्चा तर होणार नाही. त्याशिवाय अनेक विषयांवरही वार्तालाप झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याचे पडसाद राज्याच्या राजकारणात कसे उमटणार हे लवकरच पाहायला मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अमिताभ बच्चन हे मोदी सरकारच्या कामगिरीवर तर बोलत नाही ना?’, सत्यजित तांबे यांचे खोचक ट्विट
- पवार आणि मोदी यांच्यात राजकीय चर्चा तर होणारच!; ‘त्या’ भेटीवर दरेकरांची प्रतिक्रिया
- ‘..तर मग ‘त्या’ बार मालकांची साधी चौकशीही का केली नाही?’, काँग्रेसचा ईडीला सवाल
- ‘आता काय सुप्रीम कोर्टही देशद्रोहींसोबत आहे का?’ काँग्रेस नेत्याचा मोदींना खोचक सवाल
- ‘राज्यपालांनी हेवेदावे विसरून १२ आमदारांची नेमणूक करावी’, राज्य सरकारचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
