Share

व्यवस्थेला जेरीस आणू, पण ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही-विजय वडेट्टीवार

Published On: 

अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण केले तर घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या जोरावर देशाला सुराज्य मिळवून दिले. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्यांच्या विरोधात आपल्याला लढा उभारायचा आहे असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाने आयोजित केलेल्या कोकण विभागीय बैठकीसाठी वडेट्टीवार अलिबाग येथे आले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणासाठी आता केंद्रात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरू केली आहे. प्रसंगी संघर्ष करून व्यवस्थेला जेरीस आणू; परंतु ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धक्का लावू देणार नाही.

अठरा पगड जातींचा समूह ओबीसीमध्ये मोडतो. त्यांचे अनेक गंभीर प्रश्न समोर आहेत. हे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ओबीसी समाज संघटित होत आहे. ओबीसीमध्ये मोडणाऱ्या सर्व समाजांनी आपले स्वार्थ बाजूला ठेवून संघर्ष करण्याची वेळ आल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!