🕒 1 min read
मुंबई : दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितले आहे. असे सांगून राज्य सरकारने यंदाच्या दहीहंडी लाल झेंडा दर्शवला आहे. एकंदरच कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी संघांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारण्यामागची कारणे देखील सांगितली आहेत.
आता दहीहंडी उत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याने अनेक राजकीय पक्षांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून सरकारला घेरले आहे. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडीसाठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय. किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा. तेव्हा, कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.
सरकारकडून केवळ मराठी सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहे. एकतर दहीहंडीसंबधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते. जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही. गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत असे मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.
तर भाजपने महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर उघडण्याच्या मागणीला सतत वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या हिंदूविरोधी ठाकरे सरकारने समन्वय समितीने केलेल्या तमाम सूचना धुडकावत दहीहंडी उत्सवावर बंदी लादली. या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये,’ असं भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री
- ‘लवकरच मोठे शतक येणार आहे’ विराटच्या आयसीसी क्रमवारीवर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
- ‘सुभाष जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू टळला असता मात्र त्यासाठी मंत्रालयात कोणी मंत्री तर हवा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
