🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यावर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी यजमान इंग्लंडला तिसरी कसोटी जिंकणे महत्वाचे आहे.
दुसरा कसोटी सामन्यातनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत विराट कोहलीची पाचव्या स्थानी घसरण झाली. विराटच्या या क्रमवारीबद्दल विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की काळजी नसावी लवकरच एक मोठे शतक येणार आहे. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर त्यांनी विराटसोबत संवाद साधला होता असे ते म्हणाले. ‘लॉर्ड्स कसोटीतील विजयानंतर तो अत्यंत उत्साहात होता. आणि राहिली गोष्ट त्याच्या शतकाबद्दल तर त्याची काळजी नसावी कारण लवकरच मोठे शतक त्याच्याकडून झळकावले जाईल.’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहलीची घसरण पाचव्या स्थानी झाली. क्रमवारीत सध्या रोहीत शर्मा सहाव्या स्थानी आहे. तर विराट कोहली पाचव्या स्थानी आहे. रोहित शर्माचे गुण ७७३ आहे तर कोहलीचे गुण ७७६ आहे. यामुळे जर रोहित शर्मा आगामी मालिकेत चांगली खेळी करण्यात यशस्वी ठरला तर आयसीसी क्रमवारीत तो विराटला मागे टाकु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘घाबरु नका, तिसऱ्या लाटेची तयारी पूर्ण’; राजेश टोपेंचे राज्याला आवाहन
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
