🕒 1 min read
इंग्लंड : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज फवाद आलमने शतक झळकावले आणि यासह त्याने पाकिस्तान संघासाठी इतिहास रचला आहे. त्याला एक दशकाहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.
फवाद आलम कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच शतके करणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज बनला आहे. फवादने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत रविवारी ही कामगिरी केली. डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या 22 व्या डावात पाचवे कसोटी शतक झळकावले. फवादच्या आधी पाकिस्तानचे माजी कर्णधार युनूस खान यांनी देशासाठी ही कामगिरी केली होती.
युनूस खानने 28 डावांमध्ये 5 शतके केली होती. त्याचबरोबर सलीम मलिकने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी 29 डावांमध्ये 5 शतके केली. याशिवाय फवाद आलम किंग्स्टनमधील सबिना पार्कमध्ये शतक झळकावणारा पाकिस्तानचा सहावा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी इम्तियाज अहमद, वजीर मोहम्मद, आसिफ इक्बाल, युनूस खान आणिइंजमाम उल हक यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध शतके केली होती.
35 वर्षीय फवाद आलम कसोटीत पाच शतके झळकावणारा आशियाचा सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने चेतेश्वर पुजारा, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांना मागे सोडले आहे. पुजाराने 24 डावांमध्ये पाच शतके आणि गांगुली आणि गावस्कर यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी-शहांचा पराभव निश्चित, फक्त ‘चर्चा पे चर्चा’नकोत’, संजय राऊतांचा विरोधी पक्षांना सल्ला
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
