Share

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी ; हि गर्दी टाळली पाहिजे- आरोग्यमंत्री

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याला नव्याने ४ मंत्रीपदे देण्यात आली असून त्यातील एक कॅबिनेट तर उर्वरित तीन हे केंद्रीय राज्यमंत्रिपदे आहेत. ही मंत्रीपदे देण्यात आल्यानंतर आता राज्यात वेगवेगळ्या भागात भाजपने जन आशिर्वाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेमुळे लोकांची गर्दी होत कोरोनाचे नियम धाब्यावर बसल्याचे दिसत आहे. यावरुन महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेते यांच्यात शाब्दिक वाद होताना दिसत आहेत.

त्यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी यावर भाष्य केले आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन केले आहे. तर काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला सल्ला दिला होता.

केंद्रातील जबाबदार मंत्र्यांनी जबाबदारीने वागून एक चांगला आदर्श ठेवायला पाहिजे. भाजपच्या लोकांनी याबाबत विचार करायला हवा. भाजपने गर्दी टाळायला हवी, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी भाजपला दिला आहे. त्या पुण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.भाजपने राजकीय मतभेद विसरुन कोरोना विरुद्ध आपण सगळे असं हे युद्ध असताना आपण गर्दीच्या जागा टाळाव्या. कोरोनाचे नियम आपण सर्वांनीच पाळायला हवेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!