मुंबई : कृषिप्रधान देशातल्या बळीराजाचे भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. २० ऑगस्ट रोजी मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या मंत्रालयातील आत्महत्येची घटना काही वर्षांपूर्वी समोर आली होती. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुन्हा एकदा घडली आहे.
याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून याबाबत भाष्य केले आहे. ‘मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. एखाद्या मंत्र्याने सुभाष जाधव यांची भेट घेतली असती तरी मृत्यू टळला असता. मात्र त्यासाठी मंत्रालयात कोणी मंत्री तर हवा आणि असलाच तर त्याला जनतेचा टाहो ऐकू आला पाहिजे ना.’ असे ट्वीट करून त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.
तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर आता भाष्य केले आहे.‘राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाहीये. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेले आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवी आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचं म्हणणे सरकारने ऐकावं,’ अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लवकरच मोठे शतक येणार आहे’ विराटच्या आयसीसी क्रमवारीवर प्रशिक्षकाची प्रतिक्रिया
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
