🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीं आपला अयोध्या दौरा स्थगित करण्यात असल्याचे ट्विट करून सांगितले. अयोध्या दौरा नेमकं कशामुळे स्थगित करण्यात आला यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. परंतु सांगितले जात आहे की, राज ठाकरेंची प्रकृती बरी नसल्याने स्थगितीचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आता आदित्य ठाकरेंचा दौरा आपल्या नियोजित वेळी म्हणजेच १५ जून रोजी होणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. यावेळी राऊत यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीवरही तिरकस टीकेचा बाण सोडला आहे.
संजय राऊत म्हणाले, “नियोजित वेळेला १५ जूनला आदित्य ठाकरेंचा दौरा होणार आहे. दौऱ्याची तयारी सुरू आहे, तसेच इस्कॉनच्या मंदिरालाही भेट देणार आहेत. इस्कॉन व्यवस्थापनाने त्यांना निमंत्रण दिलं आहे. अयोध्येतील साधुसंत तसेच काही प्रमुख नेत्यांना लोकांना ते भेटणार आहेत. इतर पक्षाचे कार्यक्रमही अयोध्येत होते, मला माध्यमांकडून कळलं की त्यांनी ते रद्द केले. पण ५ जूनच्या कार्यक्रमासाठी काही सहकार्य हवं असतं तर आम्ही त्यांनी केलं असतं. अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलेलं आहे, तिथे शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे.”
“भाजप नेहमीच आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून घेतं, राज ठाकरेंच्या अडचणी मला माहित नाहीत. भाजपाने असं त्यांच्या बाबतीत का करावं? भाजपा नेहमीच महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी वापरून घेतं. पण यातून काही जणांना शहाणपण यावं. यातून राज्याच्या नेतृत्वाचं नुकसान होतं. आपण वापरले जातोय हे काहींना उशिरा समजतं,” असेही संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
