Share

IPL 2022 RCB vs GT : बंगळुरूचा ‘विराट’ विजय; गुजरातला पराभवाचं पाणी पाजत ‘या’ दोन संघांना केलं स्पर्धेबाहेर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला (RCB vs GT) ८ गड्यांनी मात देत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातने बंगळुरूला १६९ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात टॉस जिंकलेल्या गुजरातने प्रथम फलंदाजी स्वीकारली.  प्रत्युत्तरात विराट कोहली-फाफ डु प्लेसिसच्या शतकी भागीदारीच्या जोरावर बंगळुरूने १८.४ षटकात सामना खिशात घातला. विराटने कमबॅक करत ७३ धावांची खेळी केली. बंगळुरूच्या विजयामुळे पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

बंगळुरूचा डाव

विराट कोहली आणि कप्तान फाफ डु प्लेसिस यांनी गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना शतकी सलामी दिली. विराट-फाफने पहिल्या गड्यासाठी ११५ धावा जोडल्या. विराटने अर्धशतक केले, तर राशिद खानने डु प्लेसिसला (४४) अर्धशतक पूर्ण करू दिले नाही. डु प्लेसिसने आपल्या खेळीत ५ चौकार ठोकले. त्यानंतर विराटने ग्लेन मॅक्सवेलसह संघाला विजयाकडे नेले. १७व्या षटकात विराट बाद झाला. विराटने ८ चौकार आणि २ षटकारांसह ७३ धावांची सुंदर खेळी केली. मॅक्सवेलने १८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. १८.४ षटकात बंगळुरूने लक्ष्य गाठले.

गुजरातचा डाव

वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सलामीवीर शुबमन गिलला (१) स्वस्तात बाद करत बंगळुरूला लवकर यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेडने (१६) थोडी फटकेबाजी केली, पण ग्लेन मॅक्सवेलने त्याला पायचीत पकडले. कप्तान हार्दिक पंड्याने गुजरातसाठी अर्धशतकी झुंज दिली. डेव्हि़ड मिलरने त्याला साथ दिली. मिलरने ३४ धावा केल्या. राहुल तेवतियाही (२)अपयशी ठरला. शेवटच्या षटकात हार्दिक-राशिदने १७ धावा वसूल केल्या. २० षटकात गुजरातने ५ बाद १६८ धावा केल्या. हार्दिक ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६२ धावांवर राहिला. तर राशिदने १ चौकार आणि २ षटकारासंह १९ धावांची नाबाद खेळी केली. हेझलवूडने आरसीबीसाठी सर्वाधिक २ बळी घेतले.

दोन्ही संघांची Playing 11

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल, जोश हेझलवूड.

गुजरात टायटन्स – वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कप्तान), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रवीश्रीनिवासन साई किशोर, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!