🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आतापर्यंत अनेक प्रसंगी चुकीच्या अंपायरिंगचा प्रत्यय अनेक संघांना आला. डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) ने देखील खेळाडूंना निराश केले. असाच एक प्रकार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT) यांच्यात दिसून आला आणि त्यामुळे गुजरातचा फलंदाज मॅथ्यू वेड भलताच चिडला.
बंगळुरूचा फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी सहावे षटक टाकले, ज्याच्या षटकातील दुसरा चेंडू मॅथ्यू वेडने स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बॅटची थोडीशी कड घेऊन पॅडला लागला आणि बाजूने गेला. मॅथ्यू वेड धावला, पण ग्लेन मॅक्सवेलने अपील केले आणि अंपायरने त्याला बाद घोषित केले.
#RCBvGT
Matthew Wade reaction in dugout ???? pic.twitter.com/IRaCB0XJqz— Anmol Dixit (@AnmolDi59769126) May 19, 2022
यानंतर मॅथ्यू वेडने तात्काळ आपली बॅट दाखवत त्याची बॅट चेंडूवर असल्याचे सांगत डीआरएसची मागणी केली. तिसऱ्या अंपायरला फुटेजमध्ये आढळले, की बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आहे, परंतु अल्ट्रा-एजमध्ये कोणतीही हालचाल होत नाही. अशा परिस्थितीत अंपायरने पायचीत घोषित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मॅथ्यू वेडचा भडका उडाला.
Matthew wade lost his control after poor umpiring #RCBvGT
https://t.co/Fs3yFpxHuT— `ash MSDian a.k.a MAX (@ashMSDIAN7) May 19, 2022
मॅथ्यू वेड एवढ्यावरच थांबला नाही, त्याने ड्रेसिंग रुमकडे जाताना आधी त्याचे हेल्मेट फेकले आणि नंतर त्याची बॅट टेबलावर आदळली. गुजरात संघाच्या सहकाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करून त्याला रोखले. मग त्याचा राग शांत झाला. वेडने २ चौकार आणि एका षटकारासह १६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
