Share

 ‘केजीएफ २’ ची ‘बाहूबली २’ ला टक्कर, या आठवड्यात खरी कसोटी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :-    दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा ‘बाहूबली २’ हा हिंदी चित्रपट २०१७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सलग ३५ दिवस 1 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. आता या विक्रमाने दिग्दर्शक प्रशांत नीलच्या कपाळावरही पट्टी बांधली आहे. हिंदी चित्रपटांमध्ये आत्तापर्यत ४३० कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या ‘केजीएफ २’ या हिंदी चित्रपटाचे स्वप्न पूर्ण होताना दिसत नाही, पण हा चित्रपट पाच आठवडयाच या ठिकाणी येऊन थांबला आहे, जिथे बाकी चित्रपटांना यायला अजून काही वर्ष लागू शकतात.

‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कमाईच्या बाबतीत ‘बाहूबली २’ या हिंदी चित्रपटाशी तुलना केली जात आहे. या चित्रपटाने रिलीज च्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. राजमौली यांच्या चाहत्यांना असं वाटत होत कि, ‘आरआरआर’ हा चित्रपट ‘बाहूबली २’ या चित्रपटाचा विक्रम मोडेल पण याबाबतीत ‘आरआरआर’ हा चित्रपट कमकुवत निघाला. यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ या चित्रपटाने आघाडी मारली.

‘बाहुबली 2’ हिंदी चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 247 कोटींचा जबरदस्त कमाई केली. यानंतर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात 143.25 कोटी रुपये, तिसऱ्या आठवड्यात 69.75 कोटी रुपये, चौथ्या आठवड्यात 29.40 कोटी रुपये आणि पाचव्या आठवड्यात 11.78 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाने 35 व्या दिवसापर्यंत 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करून हिंदीत नवा विक्रम केला. 36व्या दिवशी चित्रपटाची कमाई 72 लाख रुपये होती.

‘केजीएफ २’ चित्रपटाने केली बरोबरी –

‘केजीएफ २’ हा चित्रपट १०० कोटी रुपयांमध्ये बनला आहे, तर ‘बाहुबली २’ हा चित्रपट २०० कोटींमध्ये बनलेला आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाने ५११ कोटींची कमाई केली आहे पण ‘केजीएफ २’ या चित्रपटाने ४३० कोटी रुपयांची कमाई केली आहे यातच खूप मोठे यश मानले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!