Share

डॉ.आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष सोडुन अन्य पक्ष चालविणाऱ्यांना आंबेडकरवादी का म्हणायचे ?

Published On: 

शिर्डी – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष सोडुन अन्य नावाचे पक्ष चालविणारे लोक आंबेडकरवादी आहेत का असा प्रश्न रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. वंचित आघाडी चे नेते प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता रामदास आठवले यांनी त्यांना हा टोला लगावला.

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत रिपब्लिकन ऐवजी वंचित बहुजन आघाडी या नावाने पक्ष चालविणार असल्याचे जाहीर केले होते. इतर कोणी त्यांच्या पक्षातून रिपब्लिकन नाव पुसून टाकले असले तरी मी रिपब्लिकन पक्ष जीवंत ठेवणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मजबूत करण्याचे काम आपण देशभर करीत असून महाराष्ट्रातही रिपब्लिकन पक्ष सर्वसमावेशक होत आहे असे ते म्हणाले.

राजकीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी 10 जानेवारी पर्यंत पूर्ण करून 26 जानेवारी पर्यंत पक्षांतर्गत निवडणुका पूर्ण कराव्यात असे आवाहन देखील रामदास आठवले यांनी केले.शिर्डी येथील हॉटेल साई गोल्ड येथे रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशची विभागीय बैठक आज घेण्यात आली त्यात ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले.

सरकारी पडीक गायरान जमिनी ताब्यात घेऊन अतिक्रमण करण्याचे भूमीहीनांचे आंदोलन उभारण्याची गरज आहे. भूमिहीनांना प्रत्येकी 5 एकर जमीन मिळाली पाहिजे या मागणीसाठी लवकरच भूमीहीनांचे आंदोलन उभारा असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले. कार्यकर्त्यांनी रिपाइं व्यपक करताना स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जागृत राहून शासकीय योजनांचा लाभ घेऊन रोजगार प्रकल्प उभरावेत.औद्योगिक सहकारी संस्था उभारव्यात असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!