Share

…मग संजय राऊतांच कुटुंब चौकशीपासून लांब का पळतंय? भाजप नेत्याची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

याच मुद्द्यावरून कालपासून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. दरम्यान, भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राऊतांच कुटुंब ईडीचौकशी पासून का पळतंय? असा सवाल करत त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ‘संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना ईडीनं तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. मग त्यांचं कुटुंब चौकशीसाठी का हजर होत नाही? ते चौकशीपासून का पळताहेत?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तर, ‘एचडीआयएलनं पीएमसी बँकेचे ५४०० कोटी हडपले आहेत. एचडीआयएलचे प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाशी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. याच प्रवीण राऊत यांचे संजय राऊत यांच्या कुटुंबाशी खास संबंध आणि आर्थिक व्यवहार आहेत. संजय राऊत व प्रवीण राऊत यांच्या कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. हा पैसा कुठून आला? एचडीआयएलच्या माध्यमातून पीएमसी बँकेचा पैसा कुठून कुठे गेला? एचडीआयएल आणि त्यांच्या समूहातील कंपन्यांकडून दोन्ही राऊत कुटुंबांना किती रक्कम मिळाली?, याची चौकशी व्हायलाच हवी,’ अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!