Share

चोर नाही तर चक्क पोलिसच गेले चोरांना पाहून पळून…

Published On: 

पुणे: साधारणतः पोलिसांना पाहून चोर पळल्याच्या घटना नेहमी घडतात पण पुण्यातील औंध येथे एक अजब प्रकार घडला आहे. एका सोसायटी मध्ये चोर शिरले. चोर आल्याची चाहूल लागताच कोणीतरी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. हे पोलीस आले खरे मात्र चोरांना पाहून पोलिसांनीच धूम ठोकली आहे.

पुण्यातील औंध येथे सिद्धार्थ नगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीत आज पहाटे ३ च्या सुमारास ४ चोर घुसले होते. यांपैकी दोघांनी वॉचमनला चाकू दाखवून पकडून ठेवले होते. तर दोघांनी फ्लॅट चे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला होता. या फ्लॅट मध्ये काही नसल्याने चोरांचा प्रयत्न फसला यावेळी या चोरांनी एका घरातून एल ई डी टीव्ही चोरताना चोर आल्याची चाहूल लागताच कोणीतरी पोलिसांना सांगितले.

हा सर्व प्रकार सी सी टीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामध्ये पोलीस घटना स्थळी आले मात्र चोरांना पाहून पोलिसांनीच पळ काढण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांच्या हजरजबाबी पणाच्या अभावी हे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारां वर पोलिसांचा वचक राहिलेला नसून शहरातील चोऱ्या ,  गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर या चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!