ऑस्ट्रेलिया : ऍडलेडमध्ये झालेल्या लज्जास्पद पराभवाचा बदला भारताने मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रहाणेच्या या नेतृत्वासाठी त्याचं देशासह क्रीडा विश्वातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
विराट कोहलीनेही भारतीय संघाचं अभिनंदन करत अजिंक्यचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला जिंकण्यासाठी अवघं 70 धावांचं लक्ष दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करुन ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. यानंतर विराटने ट्विट करत म्हटलंय, “भारतीय टीमने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि विजय मिळवला. भारतीय खेळाडू आणि खासकरून अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल मला विशेष आनंद आहे. यानंतर भारतीय संघाची कामगिरी अधिक सरस असेल”.
What a win this is, absolutely amazing effort by the whole team. Couldn't be happier for the boys and specially Jinks who led the team to victory amazingly. Onwards and upwards from here ????????????
— Virat Kohli (@imVkohli) December 29, 2020
कर्णधार अजिंक्य रहाणेंचं झुंजार शतक, रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी आणि टीम इंडियाच्या बोलर्सची टिच्चून गोलंदाजीच्या बळावर भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारुंना आठ विकेट्सने नमवून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. अजिंक्यच्या मॅचविनिंग खेळीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- शेतकरी विरोधी भाजपला गावात ‘नो एन्ट्री’, गावात आले तर घातला जाणार चपलेचा हार !
- ‘ईडी : येथे भाजप विरोधातील नेत्यांना नोटीस दिल्या जातात’

