Share

प्रकाश आंबेडकरांचा समाजाला कुठलाही फायदा झालेला नाही; रामदास आठवलेंची टीका

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर:- प्रकाश आंबेडकर यांना घेतल्यामुळे भाजपची फार मोठी ताकद वाढेल, असे अजिबात नाही. आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार व खासदार निवडून आलेला नाही, त्यांनी फक्त मते खाण्याशिवाय काही केलेले नाही. त्यामुळे समाजाला त्याचा कुठलाही फायदा झालेला नाही. समाजाला फायदा होण्यासाठी त्यांनी एनडीएमध्ये यावं असे मी म्हणालो होतो, पण तशी त्यांची भाजपला काहीही गरज नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नगरमध्ये बोलताना दिली.

तसेच माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगर दक्षिणची लोकसभेची जागा 2009 साली सोडली असती, तर उत्तरेत माझा पराभव झाला नसता. परंतु आता दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ.सुजय विखे पाटील खासदार झालेत. पण पुढच्या लोकसभा निवडणुकीत मी शिर्डीतून पून्हा येईन, पुन्हा येईन आणि लवकर परत जाणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपण येथून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवू शकतो, असे संकेत दिले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मनात शिर्डीत ११ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाची सल कायम आहे. आतापर्यंत ते या पराभवासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच विखे पाटलांनाही जबाबदार धरत होते. आता त्यांची भाषा थोडी बदलली असून विखे यांच्या मदतीनेच या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!