पुणे : पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता.
असे असतांनाच आता किरीट सोमय्या यांनी या घटनेसंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला असून ५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेचा हेतू पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता. संलग्न व्हिडिओ क्लिप पहा, “मोठा दगड” आणि.., असे सोमय्या म्हणाले आहेत.
Shivsena 's intention was to KILL Me on 5 February at Pune Municipal Corporation Head Quarter.
See Attached Video Clip, "Big Stone" & ………
शिवसेनेचा हेतू 5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात मला मारण्याचा होता.
संलग्न व्हिडिओ क्लिप पहा, "मोठा दगड" आणि ….. pic.twitter.com/bhBwHL5INT
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 7, 2022
दरम्यान, या घटनेनंतर पुण्यातील संचेती रुग्णालयात सोमय्यांना दाखल करण्यात आले होते. तद्पश्चात डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना काल जी दुखापत झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सगळे रिपोर्ट केले आणि उपचार केले. काल उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला अडवण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, परत त्याच ठिकाणी आता जात आहे,’ असे सोमय्या म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अमित शहा करणार संसदेत निवेदन
“शेजाऱ्याला चावण्यासाठी अंगणात साप पाळला तर एक दिवस तो आपल्यालाच डसतो”
मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही- रक्षा खडसे


