🕒 1 min read
मुंबई: ३ फेब्रुवारी रोजी बलूचिस्तान येथे झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५ सैनिक शहीद झाले आहेत. (Five Pakistani soldiers killed)अफगाणिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा प्रांतमधील कुर्रम जिल्ह्यात आतंकवाद्यांनी पाकिसात्नी सैनिकांवर गोळीबार केला. या घटनेनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला जबाबदार धरले आहे. यावरच आता भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar,) यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“शेजाऱ्याला चावण्यासाठी अंगणात साप पाळला तर एक दिवस तो आपल्यालाच डसतो. भारताच्या विनाशासाठी पाकिस्तानने पोसलेला आतंकवाद आता त्यांच्याच गळ्याचा फास बनत आहेत. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP attack on Afghanistan border) या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानचे ५ सैनिक हल्ला करून ठार मारले आहेत”, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
दरम्यान पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी टीटीपीबद्दल अगोदरच हल्ल्याची सूचना दिली होती, त्यानंतर हा हल्ला झाला. यात पाकिस्तानचे ५ सैनिक ठार झाले आहेत. यानंतर पंतप्रधान इमान खान यांनी भारताकडे बोट दाखवत या हल्याला भारताला जबाबदार धरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अमित शहा करणार संसदेत निवेदन
- INDVSWI: भारताची १०००वा सामना जिंकत विजयी सुरुवात
- पंतप्रधान मोदी येताच मुख्यमंत्री ठाकरे तटकन उठले अन्…
- “वाईन विक्रीला परवानगी देणं चुकीचं”, रक्षा खडसेंचा हल्लाबोल
- मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी मुळीच खपवून घेणार नाही- रक्षा खडसे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
