Share

IND vs WI: १००० वा ऐतिहासिक सामना जिंकण्यासोबतच रोहितने तोडला विराटचा रेकॉर्ड

Published On: 

मुंबई : रोहित शर्माने वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेतुन कर्णधार म्हणून सुरुवात केली आहे. त्याच्या कर्णधारपदाची   सुरुवातच ऐतिहासिक झाली आहे. भारताने वेस्ट इंडिजला ६ विकेट्सने पराभूत केले. ज्यात रोहित शर्माने सर्वाधिक ६० धावा केल्या आहेत. भारताच्या ऐतिहासिक विजयात रोहित शर्मा सामनावीर ठरला नसला तरी त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ६० धावांच्या खेळीत १० चौकार आणि एक षटकार ठोकला. त्या एका षटकारासह त्याने कर्णधार म्हणून भारताने जिंकलेल्या सामन्यांमध्ये ७७ षटकार पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे ज्या ज्या वनडेत भारताचा पराभव झाला आहे, त्यामध्ये कर्णधार रोहितने एकही षटकार मारलेला नाही. त्याची षटकारांची सध्याची संख्या २४४ आहे, रोहितला वनडे इतिहासात २५० षटकार मारणारा पहिला भारतीय होण्यासाठी आणखी सहा षटकारांची गरज आहे. यापूर्वी त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले होते, जो अजूनही २२९ षटकारांसह त्याच्या मागे आहे. शाहिद आफ्रिदी (३५१), ख्रिस गेल (३३१) आणि सनथ जयसूर्या (२७०) नंतर रोहित सर्वकालीन यादीत चौथ्या स्थानावर राहील.

भारताचा १००० व्या एकदिवसीय सामन्यातील विजय हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ९वा विजय होता. या विजयांसह त्याने विराट कोहलीचा पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार झाल्यानंतर सर्वाधिक ८ सामना विजयांचा भारतीय विक्रम मोडला आहे. एवढेच नाही तर कर्णधार म्हणून वनडेच्या पहिल्या ११ डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीतही त्याने विराटला मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या आता ६०० हून अधिक धावा झाल्या आहेत. त्याचवेळी विराट कोहलीने ५९२ धावा केल्या होत्या. सोबतच रोहितने वीरेंद्र सेहवागला मागे टाकत आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत रोहित शर्माचाही समावेश झाला आहे. सेहवागने ७२४० धावा केल्या होत्या. ज्याला रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६० धावा करत मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा सलामी करणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज ठरला आहे. अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने २००व्यांदा भारतासाठी सलामी दिली. आता केवळ सुनील गावस्कर २३८ वेळा) या बाबतीत त्यांच्या पुढे आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!