Share

न्यायालयाला शासकीय सुट्टी; नितेश राणेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Published On: 

सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे (BJP leader Nitesh Rane) यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांकडून तात्काळ सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर शनिवारी प्राथमिक सुनावणी झाली होती.परंतु, सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितल्याने ही सुनावणी आज (७ फेब्रुवारी ) ठेवण्यात आली होती. मात्र आज लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे.

त्यामुळे आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयही बंद असल्याने नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात (Hearing on Nitesh Rane bail application postponed) आल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली. तत्पूर्वी नितेश राणे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान शनिवारी सत्र न्यायालयात राणेंच्या जमीन अर्जावर सुनावणी झाली होती. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी हे प्रकरण दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. सरकारी वकिलांनी जिल्हा न्यायालयात अर्ज करत आमदार नितेश राणे याची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर नको अशी मागणी केली. त्यामुळे आज पुढील सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र आज शासकीय सुट्टी असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!